कणकवलीतील गडनदी दुथडी भरून वाहू लागली!
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवनावर परिणाम होऊ लागला आहे. कणकवली शहरातून वाहणारी गडनदी तुडुंब भरून दुथडी भरून वाहत असून नदीपात्रातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढली आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे नदीला पूरस्थिती निर्माण झाली असून नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
गडनदीच्या प्रवाहात मोठी वाढ झाल्याने नदीचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. मात्र, प्रशासनाने नागरिकांना पूरग्रस्त भागात किंवा नदीकाठावर जाणे टाळण्याचा सल्ला दिला आहे.













