ऐतिहासिक ! रत्नागिरी विमानतळासाठी भारतीय तटरक्षक दल व महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी यांच्यात झाला सामंजस्य करार

पालकमंत्री उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती

रत्नागिरी । प्रतिनिधी

रत्नागिरी विमानतळावरील भारतीय तटरक्षक दल (ICG) व महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (MADC) यांच्या समन्वयातून आयोजित करण्यात आलेल्या ‘सामंजस्य करारा’चा करण्यात आला.

या कार्यक्रमाला उद्योग, मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत प्रमुख उपस्थिती लावणार आहेत. तसेच जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिताताई अनंत केद्रे, आ. किरण सामंत, उद्योजक दिपक गद्रे, माजी आमदार डॉ विनय नातू, हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष रमेश कीर, आयसीजीएस रत्नागिरीचे कमांडिंग ऑफिसर कमांडंट कुणाल सी. नाईक, एमएडीसीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे आणि पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे अधीक्षक अभियंता श्री. मंगेश कुलकर्णी यांनी केले. त्यांनी प्रस्तावना केली.