सावंतवाडी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आयोजित इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा सावंतवाडी क्रमांक ४ येथील विद्यार्थिनी कु. अनुप्रिया अनुश्री अजित राणे हिने ८३.३३ टक्के गुण मिळवत जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत अकरावे स्थान पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
या यशासाठी प्रशालेतील शिक्षक श्री. महेश पालव व शिक्षिका सौ. पूजा शिंदे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनुप्रियाने शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल यश मिळवले.
याशिवाय, गणित अध्यापक महामंडळ आयोजित गणित प्रज्ञा परीक्षामध्येही अनुप्रियाने उत्कृष्ट कामगिरी करत सिल्वर मेडल प्राप्त केले आहे.
अनुप्रियाच्या या दुहेरी यशाबद्दल तिचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तिच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, पालक तसेच शिक्षणप्रेमींनी तिचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.













