रत्नागिरी जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता दाभोळ–दापोली मुख्य मार्गालाही बसला आहे. आज, ५ जुलै रोजी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास वनौशी येथे रस्त्यावर मोठे झाड कोसळल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली.
घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा आणि स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत झाड हटवण्याचे काम सुरू केले. सध्या झाड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, परिसरात अद्यापही मुसळधार पाऊस सुरू असल्याने आणखी झाडे किंवा दरडी कोसळण्याचा धोका नाकारता येत नाही. त्यामुळे वाहनचालकांनी या मार्गावरून प्रवास करताना अत्यंत सावधगिरी बाळगावी, सुरक्षित अंतर ठेवावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
Home ताज्या घडामोडी दाभोळ–दापोली मार्गावर वनौशी येथे रस्त्यावर मोठे झाड कोसळले; एकेरी वाहतूक सुरू, वाहनचालकांना...













