Chiplun Taluka-
Date- 06.07.2026
Report Time- 7:00 AM
१) सोमवार व मंगळवार या दोन दिवसांकरीता रत्नागिरी जिल्ह्याला Orange Alert आहे.
२) चिपळूणमधील वशिष्ठी नदीची इशारा पातळी ही ५ मी आहे. आता ७ वा पाणी पातळी ४.२२ मी. आहे. पाणी कमी होत आहे. आता ओहोटी सुरू आहे व पाऊसही कमी झालेला आहे. सकाळी ९ वा ओहोटी आहे. जगबुडी नदीची पाणी पातळी ९.६० मी आहे.
३) कोळकेवाडी परिसरात काल सकाळी ८ वा ते आज सकाळी ७ वाजेपर्यंत २०० मीमी पाऊस पडलेला आहे. कोळकेवाडी धरणाची पातळी १३३.७० मी आहे. सध्या कोळकेवाडी धरणाच्या दोन मशीन सुरू आहेत.
४) नागरिकांनी आवश्यक कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नये.
५) मा. जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्या आदेशानुसार सोमवार दि. ०६.०७.२०२६ रोजी शाळांना सुट्टी देण्यात आलेली आहे.












