आबलोली (वार्ताहर):
धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक कार्यात स्वतःला तन-मन-धनाने झोकून देणारा तरुण ,तडफदार दिलदार मित्र आणि युवा सामाजिक कार्यकर्ता आबलोली वरची पागडेवाडी विकास मंडळ या मंडळाचा सेक्रेटरी तसेच नमन, नाट्य, लेखक, दिग्दर्शक,अभिनेता,कलाकार आणि आबलोली गावाच्या सर्वांगीण विकासासाठी दिवस – रात्र झटणारा आबलोली गावचा सुपुत्र गोविंद भिकाजी पागडे
यांचे शुक्रवार दि.०३ जुलै २०२६ रोजी पहाटे ०२:०० वाजता मुंबई येथे अल्पशा आजाराने वयाच्या ५१ व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्याच्या निधनाची बातमी समजताच आबलोली पंचक्रोशीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
कै. गोविंद भिकाजी पागडे यांचा दशक्रिया विधी तसेच सर्व विधी रविवार दिनांक १२ जुलै २०२६ रोजी आयोजित करण्यात आल्या असून या सर्व विधी, वरची पागडेवाडी येथील त्यांच्या निवासस्थानी होतील.कै. गोविंद भिकाजी पागडे यांच्या पश्चात भाऊ सुभाष भिकाजी पागडे, दोन बहिणी,भावजय आणि दोन पुतणे असा मोठा परिवार आहे. सर्वांच्या सुख – दुःखात धावून जाणाऱ्या या सामाजिक कार्यकर्त्याच्या निधनाने आबलोली गावासह आबलोली पंचक्रोशीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.