रत्नागिरी ः प्रतिनिधी
घरासमोर आलेल्या गुरांना वेदना व याताना होतील अशा रितीने दगड व काठीने मारहाण करणाऱ्या महिलेविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवार 8 जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास करण्यात आली.
श्रावणी श्रीराम केळकर (रा.स्वरुप विश्व छाया साळवीस्टॉप नाचणे,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित महिलेचे नाव आहे. तिच्या विरोधात यशोदीप चंद्रकांत कयाळ (43,रा.औदुंबर छाया साळवीस्टॉप,रत्नागिरी) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, संशयित महिला ही फिर्यादीच्या शेजारीच राहणारी आहे. तीने सन 2024 पासून 8 जुलै 2026 या कालावधीत मोकाट गुरे ही फिर्यादीच्या घरासमोर आली असता त्यांना दगड व काठीने अमानूषपणे मारहाण केलेली आहे. त्यामुळे फिर्यादीच्या धार्मिक भावना दुखावल्यामुळे तसेच संशयित महिलेले फिर्यादी व साक्षिदार यांना शिवीगाळ करत मी तुमच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करेन अशी धमकी देत असल्यामुळे शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.













