मुणगे कारिवणे येथे शैक्षणिक साहित्य वाटप!

 मसुरे | झुंजार पेडणेकर
मुणगे आडबंदर गावचे सुपुत्र आणि आडबंदर कारीवणे पोलिस पाटील श्री.तुषार आडकर आणि प्रशासक सरपंच सौ.अंजली सावंत यांच्या सामाजिक उपक्रमातून कारिवणे जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्य, रेनकोट वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला अंगणवाडी सेविका सौ. दीपिका बागवे, मदतनीस अश्विनी मुणगेकर, प्राथमिक विभागाचे शिक्षक श्री. प्रवीण सावरे, श्री. विकी खैरनार यांनी सामाजिक बांधिलकी बद्दल शाळेच्या वतीने पोलीस पाटील तुषार आडकर व प्रशासक सरपंच अंजली सावंत यांचे आभार मानले.