सावंतवाडीतील प्रसिद्ध व्यावसायिक रामचंद्र पांगम यांचे निधन

​सावंतवाडी:
येथील उभा बाजार येथील रहिवासी आणि ‘वैकुंठ रामा पांगम स्वीट मार्ट’चे मालक रामचंद्र वैकुंठ पांगम (वय ८०) यांचे आज दुःखद निधन झाले. भाऊ पांगम या नावाने ते परिचित होते. त्यांच्या निधनाने सावंतवाडीतील व्यापारी वर्गात आणि स्थानिक परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

​रामचंद्र पांगम हे गेल्या अनेक वर्षांपासून व्यावसायिक क्षेत्रात सक्रिय होते. आपल्या मनमिळाऊ आणि व्यापारी वृत्तीमुळे त्यांनी उभा बाजार परिसरात आणि ग्राहकांमध्ये एक वेगळा स्नेह निर्माण केला होता. ते विठ्ठल भक्त होते. सावंतवाडी विठ्ठल मंदिरातील सप्ताह तसेच अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असे.

सावंतवाडीतील नामांकित ‘नाव्हेल्टी ट्रेडर्स’चे मालक प्रकाश पांगम आणि रमाकांत पांगम यांचे बंधू, तर वितिन पांगम व विश्वेश यांचे वडील होत.

​त्यांच्या निधनाची वार्ता समजताच सावंतवाडीतील अनेक व्यापारी आणि नागरिकांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन अंतिम दर्शन घेतले व पांगम परिवाराचे सांत्वन केले. त्यांच्या पश्चात दोन भाऊ, मुले, मुलगी, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.
​