रत्नागिरीत रंगणार प्रादेशिक चित्रपट महोत्सव;

रत्नागिरी :
फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडिया ( FFSI) आणि इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ फिल्म क्रिटिक्स – इंडिया ( Fipresci India) तसेच रत्नागिरी फिल्म सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने जुलै महिन्यात प्रादेशिक चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. विविध भारतीय भाषांतील पुरस्कार विजेते तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेले चित्रपट या महोत्सवात प्रदर्शित होतील. या फिल्म्स इतरत्र कोणत्याही चॅनेलवर उपलब्ध नसून केवळ विविध फिल्म सोसायटी यांनाच देण्यात आल्या आहेत. काही फिल्म्ससाठी त्यांच्याशी संबंधित फिल्म हजर राहू शकतात. आपल्याला माहिती असलेल्या भाषांव्यतिरिक्त प्रचलित नसलेल्या मागधी, मिसिंग व कारबी भाषेतील चित्रपट यांत दाखवले जाणार आहेत. हा महोत्सव कार्निव्हल हॉटेल जवळ असलेल्या शर्वाणी हॉल येथे आयोजित केला आहे. जुलै महिन्यातील ११, १८ व २५ तारखांना शनिवारी दोन चित्रपट दाखवून त्यावर विस्तृत चर्चा होणार आहे. या महोत्सवाला जास्तीत जास्त चित्रपट रसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. आसनव्यवस्था मर्यादित असल्याने आपले आसन राखून ठेवणे आवश्यक. अधिक माहितीसाठी रत्नागिरी फिल्म सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. संपर्क – डॉ.नितीन चव्हाण – ८९७५७६६६०८
सुधीर मुळ्ये – ९४२१२३४०७५