गोवंश मांस तस्करी प्रकरणी संशयित आरोपीला ३ दिवस पोलीस कोठडी

​सावंतवाडी :
गोवंश सदृश्य प्राण्याच्या मांसाची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली असून, त्याला न्यायालयाने ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

​सद्दाम दावलसाब यालवट्टी (वय ३१, रा. बेटिम, नॉर्थ गोवा; मूळ रा. गदग, कर्नाटक) असे पोलीस कोठडी मिळालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

​अपघातामुळे उघडकीस आला प्रकार
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सद्दाम हा निपाणी येथून एर्टिगा गाडी (क्रमांक KA-51-MN-0470) मधून तब्बल ६०५ किलो गोवंश सदृश्य प्राण्याचे मांस घेऊन गोव्याच्या (आरपोरा) दिशेने जात होता. सकाळी ७ च्या सुमारास मुंबई-गोवा हायवेवर नेमळे फौजदारवाडी येथे त्याची गाडी दुभाजकाला (डीवायडर) धडकली आणि रस्त्याच्या उजव्या बाजूला सुमारे ५० फूट लांब जाऊन पलटी झाली. या अपघातानंतर हा तस्करीचा प्रकार उघडकीस आला.

​पोलिसांची धडक कारवाई
घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, उपनिरीक्षक प्रमोद पाटील, जमादार मनोज राऊत, श्री. सावळ, हवालदार अनिल धुरी, सुरेश धोत्रे, सुरेश पाटील, प्रवीण वालावलकर, मंगेश शिंगाडे, महेश निरवडेकर आणि पोलीस कॉन्स्टेबल भूषण भोवर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत चालकाला ताब्यात घेतले. अपघाताग्रस्त गाडी क्रेनच्या साहाय्याने पोलीस ठाण्यात आणण्यात आली. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या समक्ष रीतसर पंचनामा करून ६०५ किलो मांस जप्त करण्यात आले असून,