केंद्रशाळा निवळी नं. १ची स्वरा कोदारे शिष्यवृत्ती परीक्षा गुणवत्ता यादीत

चिपळूण (वार्ताहर) : फेब्रुवारीमध्ये इयत्ता ५ वी साठी घेण्यात आलेल्या पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत जि.प. आदर्श केंद्रशाळा निवळी नं. १ या शाळेची विद्यार्थिनी कु.स्वरा सचिन कोदारे हिने गुणवत्ता यादीत येऊन यश संपादन केले. या परीक्षेत कु.स्वरा सचिन कोदारे हिने चिपळूण तालुका ग्रामीण सर्वसाधारण गटातून गुणवत्ता यादीत आंवा क्रमांक तसेच जिल्हा गुणवत्ता यादीत ५६ वा क्रमांक प्राप्त केला.
या परीक्षेसाठी स्वराला वर्गशिक्षक विकास महाडिक, परीक्षा विभाग प्रमुख रविंद्र गोपाळ जोंधळे, रामकिसन शेकडे तसेच संजय लवंदे यांनी वर्षभर नियोजनबद्ध पद्धतीने विशेष मार्गदर्शन केले. या यशात मुख्याध्यापक संदीप गायकवाड यांची प्रेरणा ही महत्त्वाची होती असे मार्गदर्शक शिक्षकांनी यावेळी सांगितले. या यशामुळे दिगंबर सुर्वे -केंद्रप्रमुख निवळी, मुख्याध्यापक संदिप गायकवाड आणि मार्गदर्शक विकास महाडिक यांच्या बक्षिसांची ती मानकरी ठरली. स्वराने या यशामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. यापूर्वीही तिने प्रज्ञा शोध परीक्षा, मंथन परीक्षा आणि गुरूकुल परीक्षेत उज्वल यश प्राप्त केले आहे. तिला शाळेतील मार्गदर्शक शिक्षकांबरोबर वडील सचिन कोदारे, आई सौ.सानिका कोदारे यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले. कुमारी स्वराच्या या यशाबद्दल शरद शिगवण-पं. स. सदस्य, सौ.रेश्मा शिगवण-सरपंच निवळी, मनोज डिके- उपसरपंच, मिलिंद डिके -अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, निलेश बांद्रे- उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, दिगंबर सुर्वे -केंद्रप्रमुख निवळी, संपूर्ण शाळा व्यवस्थापन समिती, सर्व पालक यांनी अभिनंदन केले आहे.