चिपळूण (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा महामार्गावरील सावर्डे येथे दुचाकीला कंटेनरने मागाहून धडक दिली. या अपघातात दोघेजण जखमी झाले आहेत. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हा अपघात शुक्रवारी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास घडला. याबाबतची फिर्याद विनोद विष्णू निकम (४०, रा. सावर्डे, मूळ रा. कुटगिरी निकमवाडी, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) यांनी दिली.
यानुसार विनोद निकम हे आपल्या ताब्यातील दुचाकीने अनिल सीताराम डिके (५६, सध्या रा. सावर्डे बागवेवाडी, ता. चिपळूण, मूळ रा. फुरूस चव्हाणवाडी, ता. चिपळूण) यांना सावर्डे ते कोंडमळा असे जात असताना सावर्डे बाजारपेठ साईश्वरी हॉस्पिटलच्या जवळ असणाऱ्या पुलावर आले असता कंटेनरने मागाहून जोरदार धडक दिली. यानंतर कंटेनर चालकाने पलायन केले. या अपघातात विनोद निकम, अनिल डिके जखमी झाले आहेत. या अपघाताची सावर्डे पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. अधिक तपास सावर्डे पोलिस करीत आहेत.













