महाराष्ट्र कला साहित्य रसिक संस्था यांच्या वतीने बॅ. नाथ पै सेवांगण मालवण येथे १९ व २० ऑगस्टला आयोजन
मालवण | प्रतिनिधी : महाराष्ट्र कला साहित्य रसिक संस्था यांच्यावतीने बॅ. नाथ पै सेवांगण मालवण येथे १९ व २० ऑगस्ट रोजी ‘झिम्माड’ (मराठी कवितेच गणगोत ) या कला साहित्य महोत्सव २०२३ चे आयोजन करण्यात आल्याची माहिती महोत्सव स्थानिक संयोजन समितीच्या वतीने बॅ. नाथ पै सेवांगण येथे बुधवारी आयोजीत पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी महोत्सव स्वागताध्यक्ष किशोर कदम यासह स्थानिक संयोजन समितीच्या सरीता पवार, राजेश कदम, सिद्धार्थ तांबे, कल्पना मलये आदि उपस्थित होते.
झिम्माड महोत्सवात १९ रोजी सायंकाळी ७ वाजता ‘ऐसपैस’ या मुक्त संवादाचे आयोजन करण्यात आले आहे. मुक्त संवादाचे अध्यक्ष लता गुठे सुत्रसंचालन जितेंद्र लाड करणार आहेत. यामध्ये नितीन शेठ, संदिप जालगावकर, शरद कुन्हाडे, संदिप वाघ, संग्राम दावनगावे, निलेश शिनलकर, संगीता लोहारे, सुहास मळेकर, राकेश पद्माकर मिना, कपिल खंडागळे, निलम जाधव, प्रतिक्षा बनसोड, ओमकार परब, सुधा लोकरे, अनिल सावंत, सुनील देवळेकर आदि उपस्थित राहणार आहेत.
रात्री ८ वाजता स्टेथेस्कोप या कार्यक्रमात वैद्यकिय अधिकारी राजेंद्र राठोड, भूलतज् ज्ञ डॉ. नरसिंग इंगळे, सुसंवाद राज असरोंडकर साधणार आहेत.
२० रोजी सकाळी ८.४५ वाजता झिम्माड महोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ लेखक राजन गवस यांच्या हस्ते होणार आहेत. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कशी महेश केळुसकर असणार आहेत. समीक्षक केशव तुपे, लेखिका रश्मी काशेळकर, कवी विनायक पवार, समाजिक कार्यकर्ते राज असरोंडकर यांची उपस्थिती असणार आहे. स्वाताध्यक्ष समाजिक कार्यकर्ते किशोर कदम असणार आहेत. सुत्रसंचलक कवी राजेश कदम करणार आहेत. २० रोजी सकाळी ९.४५ वाजता कॅनव्हास या कार्यक्रमात चित्रकार नामानंद मोडकर, केशव कासार सहभागी होणार आहेत. सुसंवाद प्रथमेश पाठक साधणार आहेत.
१०.१५ वाजता अभिव्यक्तीची ऐशीतैशी हा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये लेखक प्रविण बांदेकर, माध्यम संशोधक कुंदा प्र. नी, सामाजिक कार्यकर्त्या सिरत सातपुते, कवयित्री प्रतिभा सराफ, अभिनेता मंगेश सातपुते, सामाजिक कार्यकर्ते राजश्री हिरा मधुकर आदि सहभाग घेणार आहेत. यामध्ये संजय शिंदे हे सुसंवाद साधणार आहेत.
कविसंमेलनाचे आयोजन
२० ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता कविसंमेलन होणार आहे. कविसंमेलनाचे अध्यक्ष अरूण गवळी असणार आहेत. यामध्ये अनुजा जोशी, वीरधवल परब, गोविंद काजरेकर, आनंद लोकरे, लता गुठे, वृषाली विनायक, प्रथमेश पाठक, कविता राजपूत, सिद्धार्थ तांबे, कल्पना बांदेकर, प्रिया मयेकर, जितेंद्र लाड, नंदू सावंत, कल्पना मलये, सोनाली जाधव सहभागी होणार आहेत. सुत्रसंचालक कविता मोरवणकर करणार आहेत.
दुसरे कविसंमेलन दुपारी २ वाजता होणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी शशिकांत तिरोडकर असणार आहेत. यामध्ये कवी अजय कांडर, अनिल धाकू कांबळी, जोत्स्ना राजपूत, डॉ. राजेंद्र राठोड, डॉ. नरसिंग इंगळे, शिवराम भोंडेकर, सुधीर चित्रे, राजेश कदम, श्रीकांत पेटकर, शालिनी आचार्य, संजय शिंदे, संध्या लगड, सुनील शिरसाट, जयश्री देशमुख, विशाल अंधारे, सुधाकर चव्हाण, जनार्दन सताणे सहभागी होणार आहेत. सुत्रसंचालन सरिता पवार करणार आहेत. समारोप दुपारी ३ वाजता होणार आहे. त्याचे सुत्रसंचालन सुधीर चित्ते करणार आहेत. अशी माहिती यावेळी देण्यात आली.












