भटक्या गुरांसाठी कोंडवाडा, व गुरे पकडण्यासाठी पथक : नगरपंचायतीच्या सभेमध्ये निर्णय

देवगड: प्रतिनिधी

 

देवगड जामसंडे शहरातील माेकाट जनावरांच्या प्रश्नावर कायमस्वरूपी उपायाेजना करण्यासाठी साेमवारी आयाेजित केलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत माेकाट गुरांना पकडण्यासाठी पथक नेमून पकडलेली गुरे ठेवण्यासाठी न.पं.च्या मालकीच्या नेनेनगर येथील जागेत तात्पुरत्या स्वरूपात काेंडवाडा स्थानक करण्याचा निर्णय घेण्यात आला.

 

देवगड जामसंडे न.पं.च्या सभागृहात नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा संपन्न झाली.या सभेला उपनगराध्यक्षा साै.मिताली सावंत, मुख्याधिकारी साै.गाैरी पाटील, देवगड पाेलिस निरिक्षक श्याम बुवा, स्वच्छता सभापती बुवा तारी, पाणीपुरवठा सभापती साै.तन्वी चांदाेस्कर आदी उपस्थित हाेत्या.

 

नगराध्यक्षा साक्षी प्रभू यांनी माेकाट गुरांमुळे घडलेली अघटीत घटना भविष्यात घडू नये यासाठी उपाययाेजना करण्यासाठी विशेष सभा आयाेजित करण्यात आली आहे असे सांगीतले.यावेळी नगरसेवक चंद्रकांत कावले यांनी गेल्या साडेचार वर्षात अशी बैठक का घेतली नाही.दुर्घटनेत बळी गेल्यानंतरच तुम्हाला जाग येणार का? दुर्घटनेनंतर पालकमंत्र्यांनी तात्काळ दखल घेतली मात्र आपण सर्व लाेकप्रतिनिधी आहेत ते कशासाठी? असा प्रश्न उपस्थित केला यावर न.पं.गटनेते शरद ठुकरूल यांनी या विषयावर राजकारण न करता चर्चा करून मार्ग काढणे आवश्यक आहे असे सांगीतले.

 

नगरसेवक सुधीर तांबे यांनी 31 जुलैच्या स्थायी समिती सभेत गुरे पकडण्यासाठी एजन्सी नेमण्याचा ठराव झाला त्याचे काय झाले असा प्रश्न केला.माेकाट गुरांचा विषय सभेत येताे.फक्त चर्चा हाेते ठाेस उपाययाेजना काहीही हाेत नाही.यामुळे माेकाट गुरांच्या दुर्घटनेत एका युवकाचा बळी गेला.माेकाट गुरांची समस्या वारंवार आहे यासाठी काेंडवाड्या प्रश्न मार्गी लावणे आवश्यक आहे असे सांगीतले.

 

पाणीपुरवठा समिती सभापती तन्वी चांदाेस्कर यांनी तात्पुरत्या स्वरूपात काेंडवाडा उभारणीसाठी न.पं.च्या मालकीची नेनेनगर येथे साठवण टाकीजवळ जागा असून त्या जागेला कंपाऊंड वाॅल आहे त्यामुळे त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात काेंडवाडा स्थापन करावा अशी सुचना केली.यावेळी नगराध्यक्षा साक्षी प्रभू, मुख्याधिकारी गाैरी पाटील आणि स्वच्छता सभापती बुवा तारी यांनी त्या जागेची पाहणी करून तात्पुरत्या स्वरूपात काेंडवाडा हा विषय प्राधान्यक्रमाने स्थापन करण्याबाबत सुरूवात करावी असे सांगीतले.

 

देवगड पाेलिस निरिक्षक श्याम बुवा यांनी माेकाट जनावरांबाबत पाेलिस प्रशासनाची कारवाईबाबतची भुमिका मांडली.माेकाट जनावरांबाबत कारवाई करण्यासाठी आवश्यक ते कायदे आहेत मात्र माेकाट गुरे प्रतिबंधीत करण्यासाठी पथक नेमावे लागते.माेकाट गुरांबाबत प्राधिकृत अधिकाèयाकडून तक्रार आल्यानंतर पाेलिस प्रशासनाकडून तक्रार दाखल करण्यात येईल अशी माहिती दिली.त्याशिवाय ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसुरक्षा दल स्थापन करण्याचा सुचना तालुक्यातील सर्व ग्रा.पं.ना पत्राद्वारे केल्या आहेत त्याप्रमाणे शहर सुरक्षा दल स्थापन करून त्या माध्यमातून माेकाट गुरे पकडण्याची माेहिम राबवावी.आवश्यक ताे पाेलिस बंदाेबस्त पाेलिस प्रशासनाकडून देण्यात येईल असे यावेळी सांगीतले.

 

या सभेत नगरसेविका आद्या गुमास्ते, प्रणाली माने, सुधीर तांबे, चंद्रकांत कावले यांनी त्यांचा सुचना मांडल्या.यावेळी गुरे पकडण्यासाठी नेमण्यात येणाèया पथकामध्ये मानधन तत्वावर देवगड जामसंडे शहरातील दाेन व्यक्तिना घेण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.यामध्ये राजू कावले व सुभाष धुरी यांना घेण्याचा निर्णय झाला.मात्र हे पथक सक्षम नेमा व चांगले कर्मचारी नियुक्त करा अशी सुचना बुवा तारी यांनी केली.या सभेत नेनेनगर येथे प्रथमत: तात्पुरत्या स्वरूपात काेंडवाडा स्थापन करणे, टेंबवली येथील जागेत कायमस्वरूपी काेंडवाडा उभारण्यासाठी प्रयत्न करणे, शहर सुरक्षा दल स्थापन करणे, गुरांना पकडण्यासाठी पथक निर्माण करणे, पकडलेली गुरे काेंडवाड्यात ठेवणे शक्य झाल्यास गाेशाळेत पकडलेली गुरे पाठविणे असे निर्णय घेण्यात आले.