जिल्हा परिषदेचा शाळा आदर्श पुरस्कार चिपळूण तालुक्यातील मराठी शाळा आंबतखोल तांबडवाडी या शाळेला मिळाला पुरस्कार

ना. उदय सामंत यांनी शिक्षक वर्गासह विद्यार्थी व ग्रामस्थांचा केला सन्मान .

चिपळूण (प्रतिनिधी):-जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्यावतीने आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार आणि आदर्श शाळा पुरस्कार सन 2024 /25 व 2025/2026 या दिमागदार सोहळ्यात चिपळूण तालुक्यातील आंबतखोल तांबडवाडी या शाळेला आदर्श शाळा पुरस्कार राज्याचे उद्योग मंत्री तथा पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आला या पुरस्काराने शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. या पुरस्काराबद्दल ग्रामस्थांकडून समाधान व अभिनंदनचा वर्षाव केला जात आहे.
हा कार्यक्रम रत्नागिरी येथील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात संपन्न झाला., यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे, आमदार किरण सामंत ,नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदही रानडे ,उपाध्यक्ष विलास चाळके ,कृषी व पशुसंवर्धन सभापती महेश नाटेकर, समाज कल्याण सभापती सुयोग कांबळे ,महिला व बालविकास सभापती मयुरी शिर्के ,शिक्षण व अर्थ सभापती नंदकुमार मुरकर ,यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सभापती आणि शिक्षक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सन 2025 /26 चा शाळा आदर्श पुरस्कार शाळेचे मुख्याध्यापक श्री चंद्रशेखर राऊत सहकारी श्री दशरथ निमुणकर आणि सर्व ग्रामस्थ पालक यांच्या अथक प्रयत्नाने हा पुरस्कार प्राप्त झाला. हा पुरस्कार प्राप्त करण्यासाठी शालेय व्यवस्थापन समिती शाळा विकास समिती माता पालक संघ शिक्षक पालक संघ माजी सर्व ग्रामस्थ पालक ग्रामपंचायत आंबतखोल आणि आमचे मार्गदर्शक मा. इरनाक साहेब. फुरूस प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी मा. राज महमद देसाई ,नांदगाव केंद्रातील सर्व शिक्षक मित्र तसेच सतीश सावर्डेकर सर घडशी सर शाळा विकास समितीचे अध्यक्ष श्री दशरथ बांबडे सर केंद्रातील सर्व शिक्षक बंधू यांच्या सहकार्यातून यांच्या मार्गदर्शनातून तसेच शाळेने विविध उपक्रम राबवून शाळा पुरस्काराचं स्वप्न साकार या शाळेने पूर्ण केले.
या शाळा पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये गटशिक्षणाधिकारी मा. इरनाक साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी देसाई साहेब आंबतखोल गावचे सरपंच आत्माराम बांबाडे, उपसरपंच प्रभाकर गुजर ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र बांबाडे रोहिणी खापरे शाळा विकास समितीचे अध्यक्ष दशरथ बांबाडे उपाध्यक्ष हरिश्चंद्र गांगरकर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दीक्षा खापरे उपाध्यक्ष सौ सानिका फुटक श्री दिनेश शिर्के श्री रघुनाथ राऊत श्री बाळकृष्ण खापरे श्री तानाजी फूटक श्री तुकाराम फूटक सौ दक्षता फुटक स्वरा फुटक सौ दुर्वा पवार श्री सिताराम पुटक श्री सखाराम खापरे श्री संतोष खापरे श्री बाबू खापरे, श्री गणपत महादेव खापरे श्री उदय खापरे श्री रणजीत खूनम सौ प्रिया राऊत सौ पद्मजा राऊत श्री दत्ताराम डिके केंद्रातील शिक्षक श्री संजय घाग श्री उपरे सर श्री तेटाबे श्री मनोज घाग सर उपस्थित होते.