गौरव पोंक्षे माखजन:
संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या,माखजन इंग्लिश स्कूल मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनींनी करजुवे हायस्कुल येथे झालेल्या विविध स्पर्धांमध्ये आपली मोहोर उमटवत यश संपादन केले आहे.
१४ जुलै रोजी करजुवे पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे संस्थापक महाराष्ट्र राज्य विधानसभेचे माजी अध्यक्ष स्वर्गीय दत्ताजी नलावडे (दादासाहेब) यांच्या ९१ व्या जयंतीनिमित्त माध्यमिक विद्यालय करजुवे येथे विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत कथाकथन मध्ये
इयत्ता आठवी ते दहावी गटात कु कल्याणी सचिन साठे (९वी)हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे तर कु.आदिती सुरेश कातकर(९वी) हिने,द्वितीय क्रमांक मिळवला.चित्रकला स्पर्धेमध्ये इयत्ता पाचवी ते सातवी गट
कु. वेदश्री दयानंद जड्यार (६वी)हिने प्रथम क्रमांक पटकावला.
यशस्वी विद्यार्थ्यांना रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. या यशाबद्दल माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष शशिकांत घाणेकर सचिव श्रीकांत फाटक व अन्य पदाधिकारी,मुख्याध्यापक श्री महादेव परब यांनी या विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.













