राजापुरात विनापरवाना लोखंडी कोयता बाळगणाऱ्या संशयित आरोपीवर गुन्हा दाखल

राजापूर :
​राजापूर शहरातील हायस्कूल गोडेदाते कला, वाणिज्य व विज्ञान ज्युनियर कॉलेजसमोरील रस्त्यावर विनापरवाना आणि संशयास्पदरीत्या लोखंडी कोयता बाळगल्याप्रकरणी एकावर कारवाई करण्यात आली आहे. श्रीकांत भगवान तांबे (वय ५१, रा. पडवे तांबेवाडी, ता. राजापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. १४ जुलै २०२६ रोजी सायंकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. राजापूर पोलीस ठाण्यातील वैष्णवी विष्णू कांबळे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. संशयित आरोपीच्या ताब्यातून सुमारे १७ इंच लांबीचा, अर्धचंद्राकृती वक्र आकाराचा आणि प्लास्टिकची मूठ असलेला जुना लोखंडी कोयता जप्त करण्यात आला आहे. या कोयत्याबाबत संशयित आरोपीला समाधानकारक उत्तर देता न आल्याने, त्याने हा मुद्देमाल चोरी किंवा लबाडीने मिळवला असल्याच्या संशयावरून पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा नोंदवला असून राजापूर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.