वेंगुर्ले येथे आम. दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त “मोफत आरोग्य शिबिर”

शनिवार १८ जुलै रोजी आयोजन : सचिन वालावलकर यांची माहिती

वेंगुर्ले : प्रतिनिधी
शिवसेनेचे नेते तथा माझी पालकमंत्री आणि विद्यमान आमदार दिपक केसरकर यांचा वाढदिवस आदरवर्षी विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा केला जातो. त्याच अनुषंगाने यावर्षी वेंगुर्ले येथे आम. केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार दि.१८ जुलै रोजी सकाळी १० ते दु. २ वा. या वेळेत “मोफत आरोग्य शिबिर” चे आयोजन करण्यात आले आहे. तरी वेंगुर्ला शहरातील आणि तालुक्यातील सर्वांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिवसेना जिल्हा समन्व्ययक सचिन वालावलकर यांनी वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले.

वेंगुर्ले तालुका शिवसेना, सचिन वालावलकर मित्रमंडळ आणि भक्तश्रेष्ठ कमलाकरपंत लक्ष्मण वालावलकर हॉस्पिटल डेरवण व उपजिल्हा रुग्णालय वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने हे मोफत आरोग्य शिबिर घेण्यात येणार आहे. याबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषद वेळी वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जे. बी चौगुले, डेरवण हॉस्पिटलचे डॉ. सचिन धुमाळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.रवींद्र लिलके, वेंगुर्ला शिवसेना तालुकाप्रमुख बाळा दळवी, शहरप्रमुख अजित राऊळ, उपजिल्हाप्रमुख सिद्धेश परब, जिल्हा संघटक सुनील डूबळे, नगरसेविका लीना म्हापणकर, सत्यवान साटेलकर, आडेली वेतोरे संघटक मीतेश परब, प्रीतम सावंत, पंकज शिरसाट आदी उपस्थित होते.

श्री. वालावलकर म्हणाले,आ. दिपक केसरकर गेली अनेक वर्षे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अनेक उपक्रम राबवित आहेत. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आम्ही काम करीत असून १८ जुलै रोजी वेंगुर्ला येथील सदर मोफत आरोग्य शिबीर होणार असून डेरवण हॉस्पिटलच्या सहकार्याने विविध आजारावर होणाऱ्या या शिबिराचा तालुक्यातील अधिकाधिक रुग्णांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा. या शिबिरात योजनेतून अँजिओप्लास्टी, कर्करोग शस्त्रक्रिया, पित्ताशयातील खडे, कान, नाक, घसा शस्त्रक्रिया, बायपास सर्जरी, मुतखडा, प्रोस्टेड ग्रंथी, मोतीबिंदू आदी शस्त्रक्रिया मोफत होणार आहेत. तर या
शिबिरात हर्निया शस्त्रक्रिया,
महिलांचे गर्भाशयाचे आजार,
थायरॉईड शस्त्रक्रिया,
मणक्याची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, अॅपेंडीक्स शस्त्रक्रिया मुळव्याध, स्तनांमधील गाठी इत्यादी शस्त्रक्रिया अल्पदरात होणार आहेत. यावेळी जनरल सर्जन, स्त्रीरोग तज्ञ, बालरोगतज्ञ, जनरल फिजिशियन, त्वचारोग तज्ञ, कान-नाक-घसा तज्ञ, फिजिओथेरपी, अस्थिरोग तज्ञ व नेत्ररोगतज्ञ यांच्यामार्फत तपासणी केली जाणार आहे. मुंबई येथील अनुभवी व प्रख्यात बाल शल्यचिकित्सक डॉ. पारस कोठारी यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. २१ व २२ जुलै रोजी बी. के. एल. वालावलकर रुग्णालय, डेरवण येथे विशेष कॅम्प होणार असून त्यासाठी १८ जुलै रोजी नोंदणी करण्यात येणार आहे. सदर कॅम्पसाठी रुग्णांना डेरवण येथे जाण्याची मोफत व्यवस्था व डेरवण हॉस्पिटलच्या वतीने संबंधित आजारावर मोफत ऑपरेशन होणार आहेत, अशी माहिती सचिन वालावलकर यांनी दिली. यावेळी डॉ. धुमाळे, डॉ. चौगुले यांनीही आरोग्य शिबिराबाबत विस्तृत माहिती देताना तालुक्यातील नागरिकांनी सहभागी होऊन याचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख हर्षद डेरे, आडेली पंचायत समिती सदस्य नितीन मांजरेकर आदी उपस्थित होते.