शिरगाव, (प्रतिनिधी)
देवगड तालुक्यातील साळशी येथे गुरुवार, १६ जुलै रोजी कर्कसंक्रांतीनिमित्त पारंपरिक भावई उत्सव साजरा करण्यात येणार आहे.
शिवकालीन परंपरेशी नाते सांगणारा हा उत्सव गावकरी आजही निष्ठेने, श्रद्धेने आणि एकजुटीने साजरा करतात. या उत्सवापासून इनामदार श्री देव सिद्धेश्वर–पावणाई देवस्थानच्या वार्षिक उत्सवाला प्रारंभ होतो.
उत्सवाच्या पूर्वसंध्येला ‘देसरूड काढण्याची’ पारंपरिक प्रथा आजही जपली जाते.













