लवकरात लवकर कोसळलेला भाग पूर्ववत करण्याची मागणी
मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग किल्ल्याच्या दोन नंबरच्या बुरुजाच्या पायथ्याच्या बाजूचे काही दगड कोसळले असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, याबाबत पुरातत्व विभागाशी संपर्क साधला असता या घटनेची माहिती वरिष्ठ कार्यालयास देण्यात आली असून पुढील कार्यवाही सुरु असल्याचे स्थानिक अधिकारी यांनी सांगितले.
जागतिक वारसा स्थळ यादीत आपला किल्ले सिंधुदुर्ग आहे. किल्याच्या बुरुजाचे सुमारे 4 ते 5 फूट रुंदीच्या जागेतील काही दगड कोसळले आहेत. लवकरात लवकर हा भाग पूर्ववत करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे.
पावसाळी कालावधी असल्याने प्रवासी होडी सेवा बंद आहे. अश्या स्थितीत किल्ल्याच्या बुरुजाच्या पायथ्याचे काही दगड कोसळले. याबाबत माहिती किल्ले रहिवाशी मंगेश सावंत यांनी दिली आहे.













