प्रतिनिधी /रोहन कांबळे
कोल्हापूर : शहरातील नवीन वाशी नाका (फुलेवाडी रिंग रोड) परिसरात भरदिवसा गोळीबाराची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात भाजप कार्यकर्ता सूरज साखरे गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, खाजगी सावकारीतून गोळीबार झाल्याची माहिती आहे.सुरज साखरे याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. दोघांकडून सुरज साखरे यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे.
हल्लेखोर किती होते त्यांनी कशाप्रकारे पळ काढला आणि हा हल्ला पूर्ववैमसत्यातून झाला की अन्य काही कारण आहे याचा कसून तपास पोलीस करत आहेत. नागरिकांमध्ये भिंतीचे वातावरण असल्याने परिसरात पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे. गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी पोलीस घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून प्रत्यक्षदर्शींचीही चौकशी केली जात आहे.
या प्रकरणातील हल्लेखोर आणि गोळीबाराचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेली नाही पोलीस प्रशासनाने अध्याप यासंदर्भात कोणती अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही. पोलीस तपासातून नेमके काय निष्पन्न होते,याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.












