भांबेड विद्यालयात पार पडली शालेय मंत्रिमंडळ निवडणूक

अटीतटीच्या लढतीत आर्यन शशिकांत गुरव मुख्यमंत्रीपदि विराजमान

लांजा (प्रतिनिधी) : भांबेड विद्यालयामध्ये शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक नुकतीच पार पडली. अत्यंत चुरशीच्या आणि अटीतटीच्या निवडणूकित आर्यन शशिकांत गुरव हा मुख्यमंत्रीपदि विराजमान झाला.
भांबेड पंचक्रोशी शिक्षण संस्था, संचलित प्रतापराव माने विद्यालय आणि सुमित्रा देसाई कनिष्ठ महाविद्यालय, भांबेड येथे शालेय मंत्रिमंडळ निवडणूक २०२६-२७ मोठ्या उत्साहात, लोकशाही पद्धतीने आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. विद्यार्थ्यांनी मतदान प्रक्रियेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवून विविध पदांसाठी आपले प्रतिनिधी निवडले.अत्यंत चुरशीच्या, अटीतटीच्या आणि रंगतदार निवडणूक लढतीत आपल्या प्रभावी नेतृत्वगुणांनी, आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्त्वाने आणि विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय ठरलेल्या कार्यशैलीने आर्यन शशिकांत गुरव यांनी मुख्यमंत्रीपदाची मानाची जबाबदारी पटकावली, तर तितक्याच दमदार आणि आकर्षक लढतीत विघ्नेश गणेश गुरव यांनी उपमुख्यमंत्रीपदावर आपली ठसा उमटवत यश संपादन केले.
मतमोजणीनंतर जाहीर झालेल्या निकालानुसार आर्यन शशिकांत गुरव यांची मुख्यमंत्री, विघ्नेश गणेश गुरव यांची उपमुख्यमंत्री, समर्थ संदेश हेगिष्टे यांची आरोग्यमंत्री, मयंक दिगंबर रसाळ यांची क्रीडामंत्री, जान्हवी उमेश चौघुले यांची स्वच्छता मंत्री, कल्याणी काशिनाथ गुरव यांची सांस्कृतिक मंत्री, प्रांजल विश्वनाथ रसाळ यांची प्रार्थना मंत्री, तनिष्का विशाल चव्हाण यांची पर्यावरण मंत्री, संस्कृती संजय काकडे यांची शिक्षण मंत्री आणि भूषण संदीप झोरे यांची शिस्त मंत्री म्हणून निवड झाली.
निवडून आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे भांबेड पंचक्रोशी शिक्षण संस्था, भांबेडचे अध्यक्ष गणेश साळुंके, सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक इलाही मुलाणी तसेच सर्व शिक्षकांनी मनःपूर्वक अभिनंदन केले. विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, लोकशाही मूल्ये, जबाबदारीची भावना आणि संघटन कौशल्य विकसित करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेली ही निवडणूक शांततापूर्ण, पारदर्शक आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.