सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांनी केलं प्रदीपसिंह देसाईंचं अभिनंदन

श्री देवी शांतादुर्गा देवस्थान उसपच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शुभेच्छा

दोडामार्ग :-
दोडामार्ग तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या उसप येथील श्री देवी शांतादुर्गा देवस्थानच्या कार्यकारिणीची निवड नुकतीच संपन्न झाली.या समितीच्या अध्यक्षपदी प्रदीपसिंग इंद्रसेन देसाई(परमेकर सरकार) यांची निवड करण्यात आली आहे.या त्यांच्या निवडीबद्दल हिंदी,मराठी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल यांनी प्रदीपसिंह देसाई यांचं खास अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या. प्रदीपसिंह देसाई(परमेकर सरकार) यांना खास आपल्या निवासस्थानी आमंत्रित करत अनुराधा पौडवाल यांनी त्यांचं अभिनंदन केलं.