⭕समुद्रातील वाळू उपशावर बंदी असतानाही वाळूची बेकायदेशीर वाहतूक
⭕ग्रामस्थांच्या सतर्कतेने दोन टेम्पो रंगेहात पकडले; तलाठी ए. जी. नाईक यांची कारवाई
देवगड (प्रतिनिधी) देवगड तालुक्यातील कुणकेश्वर तळेवाडी परिसरात समुद्र किनारपट्टीवरून बेकायदेशीर वाळू चोरी करताना उबाठा कार्यकर्त्यांचे दोन टेम्पो ग्रामस्थांनी रंगेहात पकडून महसूल विभागाच्या ताब्यात दिले. समुद्रातील वाळूचा उपसा व वापर करण्यास शासनाने बंदी घातलेली असतानाही वाळूची वाहतूक सुरू असल्याचे समोर आले. ग्रामस्थांनी सतर्कता बाळगत वाळू भरलेले एमएच-०७ एजे-४२०० अभय बाबाजी पेडणेकर, कुणकेश्वर आणि एमएच-०७ एजे-४३६० राजेंद्र कृष्णा दहिबावकर, मीठमुंबरी हे दोन टेम्पो पकडून महसूल विभागाच्या स्वाधीन केले.
कुणकेश्वर परिसरात वाळूची चोरी करून वाहतूक करणे हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालत होता. यातील वाळू चोर आज पकडण्यात आले.
कुणकेश्वरचे तलाठी ए. जी. नाईक यांनी दोन्ही टेम्पो ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू केली आहे. समुद्र किनारपट्टीवरील बेकायदेशीर वाळू उपशामुळे पर्यावरणाला मोठा धोका निर्माण होत असल्याने संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.













