दक्षिण पश्चिम रेल्वेने गाड्यांची वेळपालन क्षमता (Punctuality) सुधारण्यासाठी वास्को-द-गामा स्थानकावरील काही रेल्वेगाड्यांच्या सुटण्याच्या वेळेत १० मिनिटांचा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. सुधारित वेळापत्रक टप्प्याटप्प्याने २२ जुलै २०२६ पासून लागू होणार आहे.
बदल करण्यात आलेल्या गाड्या पुढीलप्रमाणे आहेत :
गाडी क्र. 17309 यशवंतपूर – वास्को-द-गामा डेली एक्सप्रेस : सकाळी ५.०० ऐवजी ५.१० वाजता, लागू दिनांक २२ जुलै २०२६.
गाडी क्र. 17322 जसीडीह – वास्को-द-गामा एक्सप्रेस : दुपारी २.५५ ऐवजी ३.०५ वाजता, लागू दिनांक २७ जुलै २०२६.
गाडी क्र. 18047 शालीमार – वास्को-द-गामा एक्सप्रेस : सायंकाळी ४.०० ऐवजी ४.१० वाजता, लागू दिनांक २३ जुलै २०२६.
गाडी क्र. 17316 वेलंकन्नी – वास्को-द-गामा साप्ताहिक एक्सप्रेस : पहाटे २.४० ऐवजी २.५० वाजता, लागू दिनांक २८ जुलै २०२६.
गाडी क्र. 17039 सिकंदराबाद – वास्को-द-गामा द्विसाप्ताहिक एक्सप्रेस : सकाळी ५.४५ ऐवजी ५.५५ वाजता, लागू दिनांक २२ जुलै २०२६.
गाडी क्र. 17419 तिरुपती – वास्को-द-गामा साप्ताहिक एक्सप्रेस : सकाळी ५.४५ ऐवजी ५.५५ वाजता, लागू दिनांक २३ जुलै २०२६.
दक्षिण पश्चिम रेल्वेने प्रवाशांना प्रवासापूर्वी संबंधित गाड्यांच्या अद्ययावत वेळापत्रकाची खात्री करूनच प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन केले आहे.













