मुंबई विभागातील दिवा–रोहा रेल्वे मार्गावर मध्य रेल्वेकडून काही रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक पुनर्नियोजित (Reschedule) करण्यात आले असून काही गाड्या नियमन (Regulation) करून चालविण्यात येणार आहेत. हे बदल २१ आणि २२ जुलै २०२६ रोजी लागू राहणार आहेत.
नियमन करण्यात आलेल्या गाड्या :
गाडी क्र. २०११२ मडगाव – मुंबई सीएसएमटी कोकणकन्या एक्सप्रेस (२१ जुलै) तळोजे पंचनंद येथे ८० मिनिटे थांबविण्यात येणार आहे.
गाडी क्र. ११००४ सावंतवाडी रोड – दादर तुतारी एक्सप्रेस (२१ जुलै) कळंबोली गुड्स शेड येथे ३५ मिनिटे नियमन करण्यात येणार आहे.
गाडी क्र. १२६२० मंगळुरू सेंट्रल – लोकमान्य टिळक टर्मिनस मत्स्यगंधा एक्सप्रेस (२१ जुलै) पनवेल येथे १० मिनिटे नियमन करण्यात येणार आहे.
पुनर्नियोजित गाडी :
गाडी क्र. १०१०३ मुंबई सीएसएमटी – मडगाव मांडवी एक्सप्रेस (२२ जुलै) मुंबई सीएसएमटी येथून नियोजित वेळेपेक्षा ९० मिनिटे उशिराने, म्हणजेच सकाळी ८.४० वाजता सुटणार आहे.
मध्य रेल्वेने प्रवाशांना या बदलांची नोंद घेऊन त्यानुसार प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन केले असून झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.












