मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त लांजा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन

लांजा तालुका भाजपा च्या वतीने आयोजन

लांजा (प्रतिनिधी): राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लांजा तालुका भाजपाच्या वतीने शुक्रवार दिनांक २४ जुलै रोजी लांजा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस राज्यभर विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. या अनुषंगाने लांजा तालुका भाजपाच्या वतीने हे रक्तदान शिबिर शहरातील एकलुरे हॉस्पिटल या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे.
या रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी भाजपाचे तालुका अध्यक्ष शैलेश खामकर, विराज हरमले, जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत मांडवकर, तालुका सरचिटणीस सुनील गुरव, प्रथमेश बेंडल, युवा मोर्चा अध्यक्ष जयेश माजळकर, प्रशांत कोटकर, महिला अध्यक्ष भक्ती शेट्ये , श्रीमती दाभोलकर, शिबिर संयोजक भास्कर खामकर हे मेहनत घेत आहेत
तरी या शिबिरामध्ये इच्छुक रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन रक्तदान करावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.