प्रभानवल्ली येथील श्री बल्लाळ गणेश देवस्थानात दि. २९ जुलै रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन

गुरुपौर्णिमेनिमित्त धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल

लांजा (प्रतिनिधी): तालुक्यातील प्रभानवल्ली येथील श्री बल्लाळ गणेश देवस्थानात बुधवार, दि. २९ जुलै रोजी गुरुपौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरु पौर्णिमेनिमित्त सकाळी ९ ते १२ या वेळेत श्रींचा अभिषेक होणार असून, दुपारी १२ वाजता श्रींची महाआरती पार पडेल. त्यानंतर दुपारी १ वाजता उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच दुपारी २ वाजता मंगेश बुवा जाधव व अनिल चव्हाण यांचे सुरेल भजनाचा कार्यक्रम होणार आहे.
त्याचप्रमाणे या भाविकांना श्रींची अभिषेक सेवा करावयाची असेल किंवा महाप्रसादासाठी सहकार्य करू इच्छिणाऱ्या भाविकांनी, अमोल रेडीज (मो. ७५८८९१८३४४), वसंत पावसकर-७०३०७५६८१०, मंगेश जाधव -९४२०६१५३६६ यांच्याशी संपर्क साधावयाचा आहे.
तरी या कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थानतर्फे करण्यात आले आहे.