माजगाव गरड येथे दोन कारची समोरासमोर धडक 

चालकाला झोप लागल्याने अपघात : सुदैवाने कोणीही जखमी नाही 

 

सावंतवाडी : मुंबई गोवा जुन्या महामार्गावर सावंतवाडीच्या दिशेने जाणाऱ्या कारच्या चालकाला झोप लागल्याने त्याच्या कारची धडक समोरून येणाऱ्या गाडीला बसली. या अपघातात दोन्ही गाड्यांच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले.

माजगाव गरड येथे सकाळी आठच्या सुमारास हा अपघात झाला. सुदैवाने अपघातात कोणीही जखमी झाले नाही. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.