रविंद्र नागरेकर यांचा राजापूर तालुका कुणबी पतपेढीच्या वतीने सत्कार

राजापूर (वार्ताहर): डोंगरी भाग विकास कार्यक्रमाच्या जिल्हास्तरीय समितीवर अशासकीय सदस्य म्हणून शिवसेना नेते रविंद्र नागरेकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल राजापूर तालुका कुणबी सहकारी पतपेढी मर्यादित, राजापूर यांच्या वतीने संस्थेचे चेअरमन प्रकाश मांडवकर यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी व्हा. चेअरमन प्रकाश लोळगे, यांसह संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पाटकर तसेच कर्मचारी वृंद उपस्थित होते. उपस्थितांनी रविंद्र नागरेकर यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.