सिं .शि .प्र.मं .अभियांत्रिकी महाविद्यालय, कणकवली येथे लोकमान्य टिळक आणि चंद्रशेखर आझाद यांची जयंती आज रोजी दि. 23 जुलै 2026 ला उत्साहात साजरी! 

“”स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!”तसेच”आझाद ही रहे हैं, आझाद ही रहेंगे!” भारताच्या स्वातंत्र लढ्यात अजरामर राहिलेल्या दोन महान क्रांतिकारकांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय सेवा योजना च्या वतीने “देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात मोलाचे योगदान देणाऱ्या या दोन्ही महापुरुषांच्या स्मृतीस यावेळी विनम्र अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात कॉलेजच्या मुख्य प्रांगणात असलेल्या छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून कॉलेजचे प्राचार्य मा.श्री.डॉ.डी.एस.बाडकर सर हे उपस्थित होते, आपल्या एकाच सिंहगर्जनाने ब्रिटिश सत्तेचा पाया हादरवून टाकणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी झाला.

लोकजागृतीचे कार्य: इंग्रजांविरुद्ध लढा उभारण्यासाठी त्यांनी ‘केसरी’ आणि ‘मराठा’ ही वृत्तपत्रे सुरू केली,

नेतृत्व: भारतीय असंतोषाचे जनक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टिळकांनी स्वातंत्र्यलढ्याला जन आंदोलनाचे रूप दिले महाविद्यालयातील विद्यार्थीनी कु. सिद्धाली नाईक हिने त्यांचे योगदान विद्यार्थ्यांना आपल्या मनोगतात व्यक्त केले

.तसेच शौर्य आणि बलिदानाचा धगधगता ज्वालामुखी-क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांनि दिलेल्या योगदानाबद्दल कु. समीक्षा सांडव हिने आपले मनोगत व्यक्त केले.महाविद्यालयाचे प्राचार्य मा.श्री.डॉ.डी.एस.बाडकर सर यानी आपल्या मनोगतात त्यांच्या विचारांना उजाळा दिला. एका बाजूला वैचारिक क्रांती आणि लोकजागृतीचे प्रतीक असणारे लोकमान्य टिळक, तर दुसऱ्या बाजूला देशासाठी प्राण तळहातावर घेऊन लढणारे चंद्रशेखर आझाद! या दोन्ही महापुरुषांचे विचार आणि त्याग भारतमातेच्या सेवेसाठी प्रत्येक पिढीला सदैव प्रेरणा देत राहतील.त्यांनी आपले मत विद्यार्थ्यांसमोर व्यक्त केले .

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.साक्षी मिस्त्री या विद्यार्थ्यनिनि ने केले.

हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी मा.प्राचार्य डॉ.डी.एस.बाडकर सर यांचे बहुमूल्य असे मार्गदर्शन लाभले.यावेळी एस. एस. पी. एम. अभियांत्रिकी महाविद्यालयातील कॉम्पुटर विभाग प्रमुख प्रा. स्वप्नील कदम सर,प्रा. सागर हर्णे सर प्रा. सुकन्या सावंत मॅडम, प्रा. नारायण मेस्त्री सर,सौं देवी चव्हाण मॅडम तसेच राष्ट्रीय सेवा योजना प्रकल्प अधिकारी प्रा.अरविंद कुडतरकर सर, डॉ.शुभांगी माने मॅडम, सचिव श्री वैभव यादव सर , विद्यार्थी प्रतिनिधी कु, गणेश नाईक,कु , प्रसाद पालव,कु तनया पांचाळ , कु सानिया मिस्त्री, समुह प्रतिनिधी कु,स्वाती मुंडले तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थीनी आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते.