स्वप्निल कदम-कुडाळ: डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांच्या शिफारशीनुसार ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव (RHWE) कार्यक्रमांतर्गत आंदुर्ले येथे भोपळवर्गीय पिकांमध्ये रक्षक सापळा (Rakshak Trap) बसविण्याचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले.
या प्रात्यक्षिकाद्वारे शेतकऱ्यांना रक्षक सापळ्याची योग्य पद्धतीने उभारणी, त्याचे महत्त्व, किडींचे निरीक्षण तसेच रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी करून पर्यावरणपूरक पद्धतीने एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM) कसे करता येते, याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. रक्षक सापळ्याच्या प्रभावी वापरामुळे पिकांचे किडींपासून संरक्षण होऊन उत्पादनवाढीस मदत होऊ शकते, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
या उपक्रमाचे आयोजन उद्यानविद्या महाविद्यालय, मुळदे येथील विद्यार्थिनी कु. समृद्धी कुंभार, कु. धनश्री कुंभार, कु. संजीवनी झेंडे, कु. अनघा परब, कु. प्रिती मालणकर, कु. अभिज्ञा हरमळकर, कु. आयशा, कु. इशिका राज आणि कु. अंजना सी. एस. यांनी केले. उपस्थित शेतकऱ्यांनी प्रात्यक्षिकाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत पर्यावरणपूरक आणि शाश्वत शेतीसाठी अशा उपयुक्त तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची तयारी दर्शविली.













