गौरव पोंक्षे माखजन:
संगमेश्वर तालुक्यातील माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाच्या इंग्लिश मिडीयम स्कूल सरंद (माखजन) येथे आषाढी एकदाशी निमित्त विविध कार्यक्रम झाले.
‘विठूचा गजर हरीनामाचा झेंडा रोवीला’ असा गजर करत विद्यार्थ्यांनी फेर धरला.प्रशालेच्या आवारात निघालेल्या दिंडीत विद्यार्थ्यांनी वारकरी सांप्रदायाची वेशभूषा केली होती.टाळ मृदूंगाच्या साथीने विठूराया च्या जय घोषात दिंडी निघाली होती.दिंडी दरम्यान विद्यार्थ्यांनी फुगड्या ही घातल्या.यामध्ये शिक्षक देखील रममाण झाले होते.इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका धनश्री राजेसावंत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढी एकादशी निमित्त विविध कर्यक्रम झाले.यामुळे विठ्ठला वर आधारित विद्यार्थ्यांनी अभंग सादर केले.
यावेळी पारंपरिक वारकरी वेषात नटून दिंडीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक पाहण्यासाठी विद्यार्थी,पालक उपस्थित होते.यावेळी गौरी कोकाटे,मीनाक्षी सावंत,भक्ती महाडिक,कौशल्य वेलोंडे,स्वाती उत्तरे,वैभवी कवळकर व अन्य शिक्षक वर्ग आदी उपस्थित उपस्थित होता.कार्यक्रमाच्या यशस्वी तेसाठी सर्व शिक्षकांनी मेहनत घेतली.












