विठ्ठल .. विठ्ठल” हरीनामाने अवघी शाळा पंढरीमय झाली; दादासाहेव सरफरे विद्यालयात आषाढी एकादशी साजरी

देवरूख (प्रतिनिधी):

हरीनामाचा गजर करीत बाल विठ्ठल रखुमाई, संतमेळासह आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल.. विठ्ठल हरीनाम मुखी घेत दादासाहेब सरफरे विद्यालय बुरंबी हायस्कुलचे विद्यार्थी आषाढी एकादशी निमित्त बालदिंडीत सहभागी झाले.

अवघ्या विश्वाचा पसारा वाहताना सदैव पंढ़रीत आत्मरुप भक्त दर्शनासाठी कटेवरी कर ठेवून उभा असणारा सावळा विठ्ठल. भक्ती सौंदर्याने नटलेली रुक्मीणी, भक्तीस्वरुप संत तुकाराम, संत जनाबाई, या वेशातील विद्यार्थी त्याच प्रमाणे नऊ वारी साडी, नाकात नथ या वेशात डोईवर पदर घेवून तुलसीवृदांवनासह सहभागी शाळेतील विद्यार्थीनी आणि हातात टाळ, विणा, मुर्दूगासह वारकरी वेशातील सर्व सहभागी विद्यार्थी यांची बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्था विद्या संकुलापासून सुरु झालेली हरीभक्ती दिंडी बुरंबी नाका अशी भगव्या पतका फडकवित “विठठल विठठल.. जय हरी” या हरीनामासह टाळ मुर्दुगाच्या गजरात तेर्ये व्राह्मणवाडी येथील विठठल रखुमाई मंदीरात मार्गस्थ झाली. यावेळी मंदिराचे व्यवस्थापक, तेर्ये गावचे ग्रामस्थ व वारकरी मंडळीने पालखीसह हरीभक्तीत त्ल्लीन होवुन आलेल्या आलेल्या बाल दिंडीचे भाव भक्तीने स्वागत केले.

यावेळी सर्व विद्यार्थी व शिक्षकांनी “पंढरीनाथ महाराज की जय” असा जयघोष करीत यांनी मंदीरातील आद्य गणपती व विठठल रुक्मीणी याV देवतांचे दर्शन घेतले. मंदिरात आषाढी एकादशी निमित्त ग्रामस्थ व पुजारी यांनी तुलसी पत्र, बेलाचे पान, दुर्वा जास्वंदी फुलांसह देवाची केलेली प्रभातपुजा व देवाचे साजिरे रुप पाहून विद्यार्थी आत्मतेजोमय होवुन अवघ्या भक्ती रसात न्हावून गेले. यावेळी विद्यालयाच्या बाल वारक-यांनी टाळ मुर्दुगाच्या गजरात वारकरी नृत्य करीत “या विठुचा गजर हरीनामाचा … झेंडा रोविला” या अभंग स्वरुप भक्ती गीताने मंदीर परीसर पंढरीमय करुन टाकला. साक्षात बाल रुपात विट्ठल रुक्मीणी व संताचे दर्शन झाल्याने ग्रामस्थ आत्मपावन झाले. यावेळी मंदीर व्यवस्थापन कमिटीतर्फे मुलांना प्रसाद व खिचडी वाटण्यात आली.

या बाल दिंडीसह संस्था मुख्य कार्यकारी अधिकारी श्री शरद गोविंद बाईत, स्कुल कमीटी अध्यक्ष श्री दिनेश शामराव जाधव, ग्रामपंचायत शिवने सरपंच श्री मारुती उर्फ राजु पवार, उपसरपंच श्री अमोल रसाळ, पोलीस पाटील श्री मनोज शिंदे, शिवने गावचे माजी सरपंच चंद्रकांत गेल्ये, करंबळे गावचे प्रतिष्ठीत ग्रामस्थ श्री दयानंद पवार, मुचरी गावचे प्रतिष्ठीत ग्रामस्थ श्री मनोज मोरे, श्री संतोष गुरव तसेच तेर्ये गावचे प्रतिष्ठीत ग्रामस्थ श्री सतीश पवार, श्री अनिल गेल्ये, आशा सेविका अनुष्का मोरे, प्रशालेचे पर्यवेक्षक श्री महावीर साठे, सांस्कृतिक विभाग समितीचे मार्गदर्शक शिक्षक व शालेय शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.