राजापुरातील जुने किरणा मालाचे होलसेल व्यापारी अब्दुल गनी अब्दुल अजिज डोसानी यांचे निधन

राजापूर |प्रतिनिधी : राजापूर शहर बाजारपेठेतील जुने किरणा मालाचे होलसेल व्यापारी व रज्जाक ब्रदर्स चे मालक अब्दुल गनी अब्दुल अजिज डोसानी (७५) यांचे शनिवारी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. राजापुरातील तरूण व्यापारी दाऊद डोसानी यांचे ते वडील होत.
शहरातील जुने किरणा मालाचे होलसेल व्यापारी म्हणून अब्दाल गनी हे परिचित होते. एक शांत, सयंमी व मितभाषी व्यक्तीमत्व अशी त्यांची ओळख होती. शहरासह ग्रामीण भागातही त्यांचा या व्यवसायाच्या माध्यमातुन चांगला संपर्क होता. गेले काही दिवस त्यांची प्रकृती बरी नव्हती, त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. उपचार सुरू असतानाच शनिवारी सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालावली.
त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच शहरातील व्यापारी व अनेकांनी त्यांच्या बाजारपेठ येथील निवासस्थानी धाव घेतली व डोसानी कुटुंबीयांचे सांत्वन केले.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, चार विवाहित मुली, सुन, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्यावर रविवारी सकाळी तालीमखाना कबरस्तान येथे दफनविधी करण्यात आले.