महिला अध्यक्षपदी सौ. प्रियांका साळसकर यांची सर्वानुमते फेरनिवड;
देवगड, दि. २६ : देवगड तालुका महिला व्यापारी संघाची नवीन कार्यकारिणी नुकतीच सर्वानुमते जाहीर करण्यात आली. महिला अध्यक्षपदी सौ. प्रियांका साळसकर यांची पुन्हा एकदा सर्वानुमते फेरनिवड करण्यात आली असून त्यांच्या नेतृत्वाखाली महिला व्यापाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
नवीन कार्यकारिणीत उपाध्यक्ष म्हणून सौ. मनीषा उत्तम पोकळे (देवगड), सौ. स्वरूपा समीर सोमण (मिठबाव) आणि सौ. उर्मिला मणचेकर (पडेल) यांची निवड करण्यात आली आहे. सचिवपदी श्रीमती वैशाली मनोज हडकर, तर सहसचिवपदी सौ. कृपा जितेश भद्रा यांची जबाबदारी सोपविण्यात आली.
कार्यकारिणी सदस्य म्हणून सौ. तृप्ती प्रसाद पारकर, सौ. शीतल शैलेश कदम, कु. वैष्णवी सुधाकर जोईल, सौ. मनीषा रमेश पाटील, सौ. ऋचा राजेश पोकळे, सौ. शमा सुनील कुळकर्णी, सौ. स्मिता तुषार पवार, सौ. सानिका शुभम कुळकर्णी, कु. चिन्मयी वैभव बिडये, सौ. प्रिया मधुकर नलावडे, सौ. स्नेहा सदानंद हिंदळेकर, प्राजक्ता प्रशांत बांदेकर, सौ. अनघा अमोल काणेकर, सौ. गीतांजली सचिन हळदणकर, सौ. स्वरा सुधीर पारकर, सौ. दिपाली नितीन घाडी, कु. शीतल सुरेश तावडे, सौ. मंजिरी मधुसूदन काळे, सौ. माधवी मधुकर लडगे, सौ. तन्वी योगेश चांदोस्कर, सौ. पूजा प्रसाद वाडेकर, सौ. सुप्रिया पांडुरंग लिमये, सौ. सायली संतोष माणगावकर, सौ. प्रीतम प्रकाश कोळंबकर आणि सौ. माधुरी विश्वामित्र खडपकर यांची निवड करण्यात आली.
कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर देवगड तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष शैलेश कदम तसेच सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचे कार्यकारिणी सदस्य प्रसाद पारकर यांनी नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. महिला व्यापाऱ्यांचे प्रश्न सोडविणे, त्यांच्या व्यवसायाला चालना देणे आणि संघटना अधिक बळकट करण्यासाठी नव्या कार्यकारिणीकडून प्रभावी कामगिरी होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.














