प्रतिनिधी /रोहन कांबळे
कोल्हापूर: महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे कोल्हापूर दौऱ्यावर आले असता विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. उचगाव ग्रा.प.सदस्य तलहा मणेर यांनी यावेळी १३ गाव नळपाणी पुरवठा योजनेच्या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी व्हावी व त्याबाबत कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन देण्यात आले. निवेदनात१३ गाव नळपाणी योजना आ.अमल महाडिक यांच्या विशेष प्रयत्नातून या योजनेला मंजुरी मिळाली.या कामावर महाडिक यांनी वारंवार बैठका घेऊन संबंधित यंत्रणेला सूचना दिल्या होत्या. सदर ‘मेघा इंजिनियर्स’ या कंपनीकडे योजनेचे काम आहे. या योजनेमुळे हजारो लाखो जनतेसाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अवलंबून असल्याने आपण या प्रकरणी वैयक्तिक लक्ष घालून तात्काळ योग्य ती कारवाई करावी असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी तलहा मणेर,आ.राजेश क्षीरसागर उपस्थित होते.











