लांजा (प्रतिनिधी) :आषाढी एकादशीचे औचित्य साधून
संस्कृती फाउंडेशन लांजा या संस्थेच्या वतीने सलग १२ व्या वर्षी ‘गजर हरिनामाचा!’ हा विठ्ठल भक्तिगीतांचा भक्तिमय कार्यक्रम लांजा येथील ग्रामदैवत श्री देव पौलस्तेश्वर मंदिर याठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विश्व हिंदू परिषद महिला भजन मंडळ लांजा यांनी अतिशय सुंदर भजन सादर केले. श्रीमती भिडे, श्रीमती घाटे , श्रीमती शुभांगी मुळे,प्रियंवदा जेधे आणि सहकारी यांनी यात सहभाग घेतला. हार्मोनियम शंकर मुळे, तबला राजेश गोसावी तर तालवाद्य साथ श्रीकांत बोंबले यांनी केली. त्यानंतर श्री विश्वकर्मा भजन मंडळ इंदवटी लांजा बुवा स्वप्नील पांचाळ यांनी आपल्या पहाडी आवाजाने सगळ्यांना मंत्रमुग्ध केले.नंतर श्री स्वामी समर्थ भजन मंडळ लांजा बुवा जगन्नाथ पांचाळ व बुवा सचिन लिंगायत यांनी आपल्या सुस्वर गायनाने वातावरण अधिक भक्तिमय केले. सचिन बुवा यांनी गायलेल्या गवळणीला रसिकांनी भरभरून दाद दिली.
त्यानंतर हभप जगन्नाथ महाराज गोसावी यांच्या मधुर वाणी आणि गायनाने वारकरी भक्तिगीतांचा कार्यक्रम संपन्न झाला. सुंदर ते ध्यान,रूप पाहता लोचनी, देहूडा चरणी वाजवती वेणु असे एकास एक सरस अभंग सादर करून जगन्नाथ महाराज यांनी कार्यक्रमाला उंचीवर नेवून ठेवले. हार्मोनियम शंकर मुळे, मृदुंग ॲड.नितीन गोडबोले, तबला कौस्तुभ सुतार तर साथ श्रीकांत बोंबले, गणेश बोलये, प्रभाकर मोरे,राजेश गोसावी यांनी केली.
दिवसभराच्या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन योगेश शेट्ये यांनी केले.
यावेळी शिवस्वराज्य फाउंडेशन संस्थेचा समाजरत्न पुरस्कारप्राप्त संस्कृती निमंत्रित सदस्य ओंकार आचरेकर, कलागौरव पुरस्कार प्राप्त संस्कृती संघटक योगेश शेट्ये , तर नूतन कार्यकारणी उपस्थित सदस्य अध्यक्ष गौतम कांबळे उपाध्यक्ष संतोष म्हेत्रे, सहसंपर्क प्रमुख श्रीकांत बोंबले, महिला संघटक प्रियवंदा जेधे, क्रियाशील प्रामाणिक सदस्य प्रकाश पांचाळ यांचा विशेष सन्मान करण्यात आला.तर प्रत्येक भजन मंडळाचादेखील विशेष सत्कार करण्यात आला.
संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हातभार लावणाऱ्या प्रत्येकाचे आभार संस्थापक राजेश गोसावी,अध्यक्ष गौतम कांबळे उपाध्यक्ष संतोष म्हेत्रे सचिव विनोद बेनकर यांनी मानले.
Home महत्वाच्या बातम्या संस्कृती फाउंडेशन लांजाचा ‘गजर हरिनामाचा’- भक्तिमय संगीतसंध्या कार्यक्रम उत्साहात संपन्न!












