विविध कार्यक्रमांची रेलचेल : शिष्यांनी घेतले गुरूंचे दर्शन….!
कणकवली : परमहंस भालचंद्र महाराज संस्थानात गुरुपौर्णिमा उत्साहात
कणकवली येथील परमहंस भालचंद्र महाराज संस्थानात बुधवारी गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. समाधीस्थळी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती यामुळे भक्त बाबांचे हे मनमोहक असे रूप आपल्या मोलबाईल मध्ये कैद केले.तालुक्यात ठिकठिकाणी गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. गुरुपौर्णिनिमित्त विविध व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. त्यामुळे सर्वत्र भक्तिमय वातावरण होते.
पहाटे समाधीपूजा, काकडआरती व जपानुष्ठानाने उत्सवाला प्रारंभ झाला. त्यानंतर सकाळी सर्व भक्तांच्या वतीने गुरुचरणी सामूहिक सेवा अर्पण करण्यात आली.दुपारच्या सत्रात पाद्यपूजा, अभिषेक, श्री सत्यनारायण महापूजा व आरती धार्मिक विधीपूर्वक संपन्न झाली. यानंतर उपस्थित भाविकांनी तीर्थप्रसाद व महाप्रसादाचा लाभ घेतला. दुपारी सुश्राव्य भजनांनी परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.
सायंकाळी धुपारती व रात्री बाबांची दैनंदिन आरती झाल्यानंतर गुरुपौर्णिमा उत्सवाची सांगता झाली. दिवसभर भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता. उत्सवाचे नियोजन व व्यवस्थापन परमहंस भालचंद्र महाराज संस्थानच्या वतीने नीटनेटके करण्यात आले होते.तसेच शहरातील निम्मेवाडी येथील प. पू. देवी अनुसयामाता विश्रांतीधाम आश्रम भक्तिमय वातावरणात गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. सनातन संस्थेने देखील कणकवली शहरात गुरुपौर्णिमा उत्सव साजरा केला. कळसुली-हर्डी येथील स्वामी समर्थ मठात देखील विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पडले. बीडवाडी येथील दत्त मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला.या सोबतच शाळा,महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंना पुष्प तर काहींनी संदेश रुपी ग्रीटिंग भेट म्हणून दिले.
सोशल मिडीया आणि मोबाईलच्या स्टेट्स, संदेश यातून ही आपल्या गुरुप्रति शिष्यानी आपली कृतज्ञता व्यक्त केली.












