सावंतवाडी तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी संतोष राणे यांची निवड

​सावंतवाडी:
सावंतवाडी तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या बैठकीत नवीन कार्यकारिणीची बिनविरोध आणि एकमताने निवड करण्यात आली. यामध्ये असोसिएशनच्या अध्यक्षपदी संतोष राणे, उपाध्यक्षपदी प्रेमानंद देसाई, सचिवपदी सुहास गावडे, सहसचिवपदी सचिन बागवे व अशोक परब तर खजिनदारपदी स्टीव्हन डिसिल्वा यांची निवड झाली.

​या बैठकीत संघटनेच्या जनसंपर्क अधिकारी म्हणून संयोगिता काळकुंद्रीकर तर संघटक सचिव म्हणून बाबुराव मुळीक, श्रीकांत आरोंदेकर, प्रशांत पेडणेकर व महादेव सावंत यांची निवड करण्यात आली. तसेच जिल्हा कार्यकारिणी सदस्य म्हणून आनंद रासम, विनायक दळवी, संदीप राऊळ, अमर गावडे आणि दिगंबर गायतोंडे यांची एकमताने निवड करण्यात आली.

​या सभेच्या व्यासपीठावर सिंधुदुर्ग जिल्हा केमिस्ट ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष आनंद रासम, निवडणूक निरीक्षक दयानंद उबाळे, निवडणूक निरीक्षक विजय घाडी, सावंतवाडी तालुका अध्यक्ष विनायक दळवी, सचिव संतोष राणे आणि खजिनदार कालिदास बर्वे उपस्थित होते.

​यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष आनंद रासम यांनी केमिस्ट बांधवांना औषध विक्री व दक्षतेबाबत मार्गदर्शन केले आणि संघटना नेहमी सदस्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील अशी ग्वाही दिली. निवडणूक निरीक्षक दयानंद उबाळे यांनी औषध कायद्याविषयी माहिती देऊन नियमांच्या दृष्टीने सदैव सतर्क राहण्याचे आवाहन केले. माजी तालुकाध्यक्ष विनायक दळवी यांनी आपल्या १४ वर्षांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात लाभलेल्या सहकार्याबद्दल आभार मानून यापुढेही केमिस्ट बांधवांच्या हितासाठी कार्यरत राहण्याचा पुनरुच्चार केला.

​या बैठकीस माजी अध्यक्ष श्रीराम गावडे, सचिन मुळीक, ग्रेगरी डांटस, श्रीकृष्ण सप्ते, विश्रांती नाईक, सुधीर शिरसाट, उमेश कालकुंद्रीकर, प्रसाद गुरव, आशिष सावंत, गोविंद आर्डेकर, पराग सावंत, रवि धाकोरकर, अर्जुन कदम, कार्लोस डिसिल्वा, बाळू घाटकर, गिरीधर चव्हाण, रॉक्सन डान्टस, सुरेश आडेलकर, वैष्णव केसरकर, आनंद जाधव, साईराज गावडे, प्रसाद ढेरे, स्वप्निल सावंत, गणपती काळकुंद्रीकर यांच्यासह मोठ्या संख्येने केमिस्ट व्यावसायिक उपस्थित होते.