टाटा मोटर्स चा कॉम्पॅक्ट एस यु वी मार्केट मध्ये मोठा धमाका..
रत्नागिरी:- देशातील अग्रगण्य वाहन निर्माते टाटा मोटर्स आणि त्यांचे भारतातील अग्रगण्य डीलर नेटवर्क एस.पी. ऑटोहब यांचे रत्नागिरी येथील सर्व सुविधायुक्त वातानुकुलीत शोरुम मध्ये शानदार कार्यक्रमा मध्ये टाटा पंच सी. एन. जी. ट्वीन सिलिंडर चे अनावरण डी.वाय.एस.पी. डॉ.समाधान पाटील आणि पोलीस निरीक्षक श्री भोसले साहेब यांचे शुभ हस्ते करण्यात आले.
सदर कार्यक्रम मध्ये प्रथम ग्राहक श्री.दाते आणि कुटुंबीय यांना वाहन प्रदान करण्यात आले.
संपूर्ण स्वदेशी अभियान अंतर्गत टाटा मोटर्सच्या वाहनांना मिळणारा प्रतिसाद उल्लेखनीय आहे. जुनी कार देऊन नवीन कार घेणाऱ्या ग्राहकांचा अतिरिक्त लाभ करण्याच्या दृष्टीने आकर्षक एक्सचेंज बोनस देखील जाहीर करण्यात आला आहे.
टाटा मोटर्स ची सर्व वाहने ही ग्लोबल एन कॅप अंतर्गत ४ स्टार आणि ५ स्टार सेफ्टी रेटिंग युक्त असून ४ स्टार चाईल्ड सेफ्टी रेटिंग केवळ टाटा वाहनांमध्ये असलेने ही कार संपूर्ण कुटुंबा करिता सेफ्टी च्या दृष्टिकोन मधून अत्यंत उपयुक्त आहेत. त्यामुळे ग्राहकांनी कार खरेदी करतेवेळी ग्लोबल एन कॅप रेटिंग विषयी नेट वर माहिती घेऊनच निर्णय घेणे हितावह ठरणार आहे.
सोबत १००% ऑन रोड फायनान्स , सर्वात कमी व्याजदर, ७ वर्ष कर्ज मुदत, खास शेतकरी बांधव करिता ७/१२ आणि ८अ वर कर्ज सुविधा आणि सहामाही ईएमआय अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
एस.पी. ग्रूप ने गोवा, गुजरात,राजस्थान येथील अभूतपूर्व अशा यशानंतर महाराष्ट्रात प्रथमच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा द्वारे प्रवेश केला आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सुशिक्षित सेल्स आणि सर्व्हिस ने परिपूर्ण असे रत्नागिरी मधील सर्वात मोठे असे वातानुकूलित शोरुम ग्राहकांच्या सेवे करिता उपलब्ध करून दिले आहे.
टाटा कार श्रेणी अंतर्गत येणाऱ्या टियागो टिगोर पेट्रोल आणि सी.एन.जी.
नेक्सोन पेट्रोल आणि डिझेल पुंच, अल्त्रोझ, सफारी ७ सीटर, हॅरीअर ही सर्व वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
नुकतीच टाटा ने अलत्रोझ ही प्रीमियम हॅचबॅक श्रेणी मध्ये कार आणि पाठोपाठ पंच ट्वीन सिलेंडर सी.एन.जी.मध्ये उपलब्ध करून दिली असल्याने सदर दोन्ही कार चे बुकिंग ला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
या प्रसंगी श्री.दाते, श्री.कल्पेश जाधव ई.मान्यवर उपस्थित होते.
ग्राहकांनी अधिक माहिती करिता आमचे नजीकच्या शाखेशी संपर्क साधावा आणि टाटा कार च्या संपूर्ण स्वदेशी अभियानाचा अनुभव घ्यावा, असे आवाहन अरुण देशपांडे यांनी पत्रकाद्वारे केले आहे.












