शिवसेनेची मसुरेत आढावा बैठक संपन्न; आगामी पक्ष धोरणे आणि बिएलएच्या कामकाजाबाबत सविस्तर मार्गदर्शन

▪️सर्व बी. एल. ए. नी सतर्क राहून काम करण्याचे काका कुडाळकरांचे आवाहन

मसुरे | झुंजार पेडणेकर :मसुरे येथे प. स. सदस्य छोटू ठाकूर यांच्या निवासस्थानी शिवसेना जेष्ठ नेते काका कुडाळकर

यांच्या अध्यक्षतेखाली मसुरे विभाग शिवसेना या पक्षाच्या वतीने बी.एल. ए. संदर्भात आढावा बैठक नुकतीच पार पडली.

यावेळी काका कुडाळकर यानी मार्गदर्शन करताना बी.एल. ए. ची गरज, मतदार यादी, पुनरीक्षणातील भूमिका, पक्ष संघटनेसाठी त्याचे महत्त्व तसेच आगामी पक्ष धोरणे आणि त्याचे गांभीर्य अतिशय स्पष्टपणे समजावून सांगितले.

बी.एल. ए. यांनी सुद्धा कशा पद्धतीने काम केले पाहिजे याबाबतही सविस्तरपणे माहिती दिली. सर्व बी एल ए यांनी सतर्क राहून कामकाज करा असे आवाहनही त्यांनी आढावा बैठकीत बोलताना केले. यावेळी उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा काही प्रश्न उपस्थित करून कामकाज संदर्भात माहिती करून घेतली. जिल्हा युवक अध्यक्ष संग्राम साळसकर, तसेच तालुकाध्यक्ष विनायक बाईक यांनी सुद्धा महत्वपूर्ण मार्गदर्शन केले.

यावेळी पंचायत समिती सदस्य छोटू ठाकूर, शिवसेना युवक जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, तालुकाप्रमुख विनायक बाईक, तालुका संपर्कप्रमुख राजेश गावकर,विभागीय अध्यक्ष संतोष पालव,जितेंद्र परब, पप्पू मुळीक, वेरली सरपंच धनंजय परब, तात्या हिंदळेकर,शिवाजी परब, श्री. शिंगरे, जितेंद्र परब, सतीश मसुरकर, बाबू येसजी, अशोक बागवे, सिद्धेश मसूरकर, राहुल बागवे,

सचिन पाटकर, किशोर ठाकूर, मनोज पालव, महेश बागवे, अनंत भोगले, निलेश मसुरकर, तात्या परब, राजाराम मुळीक, किरण पाटील आणि शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते बी. एल. ए. उपस्थित होते. छोटू ठाकूर आणि संतोष पालव यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले.