राजापूर | प्रतिनिधी : हातिवले येथील टोलनाका मोडतोड प्रकरणी पोलीसान्नी गुन्हा नोंद करुन अटक केलेले मनसेचे तालुकाध्यक्ष पंकज पंगेरकर आणि उपाध्यक्ष जयेंद्र कोठारकर यान्ना राजापूर दिवाणी न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी ठोठावली आहे .
गुरुवारी मुंबई गोवा हातिवले टोल नाक्यावर मोडतोड करण्यात आली होती . त्यामध्ये तेथील केबीनच्या काचा फोडण्यात आल्या होत्या . राजापूरपोलीसान्नी मनसेचे तालुकाध्यक्ष पंकज पंगेरकर आणि तालुका उपाध्यक्ष जयेंद्र कोठारकर यान्ना ताब्यात घेवुन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता मनसेच्या त्या उभय पदाधिकाऱ्यान्ना शुक्रवारी (दि १८ ऑगस्ट)येथील न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली असल्याची माहिती राजापूर पोलीसान्नी दिली .










