नागरिकाच्या बँक खात्यातून चक्क ६ लाख गायब

Crime
ऑनलाइन फसवणुकीचा रत्नागिरीतील शांति नगर येथील इसमाला फटका
रत्‍नागिरी ः प्रतिनिधी

शहरातील शांतीनगर येथील नागरिकाच्या बँक खात्‍यातून अज्ञाताने तब्बल 6 लाख रुपये ऑनलाईन पध्दतीने काढून फसवणूक केली. ही घटना शनिवार 25 जुलै रोजी सायंकाळी 6.36 ते 7.37 वा.कालावधीत घडली आहे.

याबाबत फसवणूक झालेले धीरज अर्जुन भानूशाली यांचे कर सल्लागार मित्र राजेश रमेश सोहनी (रा.आश्रय शांतीनगर नाचणे,रत्‍नागिरी) यांनी शुक्रवार 31 जुलै रोजी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्‍यानुसार, अज्ञाताने धीरज भानूशाली यांच्या बँक ऑफ इंडिया शाखा मारुती मंदिर येथील बचत खात्‍यातून 5 लाख 86 हजार 9 रुपये ऑनलाईन पध्दती काढून घेत फसवणूक केली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कलम 318(4),माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 66 (ड) प्रमाणे भादंवि कायदा कलम 420 अन्वेय गुन्हा दाखल करण्यात आला आहे.