झाडावरील पडून जखमी नाणीज येथील युवकाचा मृत्यू

रत्‍नागिरी ः प्रतिनिधी
झाडाच्या फांद्या तोडत असताना खाली पडून जखमी झालेल्या तरुणाचा उपचारांदरम्यान गुरुवार 30 जुलै रोजी रात्री 10 वा.सुमारास जिल्हा शासकिय रुग्णालयात मृत्‍यू झाला. याबाबत ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्‍यूची नोंद करण्यात आली आहे.
मंगेश किसन हतपले (29,रा.नाणीज मधीलीवाडी,रत्‍नागिरी) असे उपचारांदरम्यान मृत्‍यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्‍याचा भाउ वैभव हतपले याने ग्रामीण पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. त्‍यानुसार, 28 जुलै रोजी मंगेश व वैभव हे दोघेही मोलमजुरीच्या कामासाठी 28 जुलै रोजी नाणीज येथील अजित कदम यांच्या आंबा कलम बागेत गेले होते. त्‍याठिकाणी आंब्याच्या झाडाच्या फांद्या तोडत असताना सकाळी 9.30 वा.सुमारास मंगेश हा झाडावरुन खाली जमिनीवर पडून जखम झाला. त्‍याला तातडीने ग्रामीण रुग्णालय पाली येथे दाखल करुन अधिक उपचारांसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्‍याठिकाणी उपचारांदरम्यान गुरुवार 30 जुलै रोजी रात्री 10 वा. मंगेशचा मृत्‍यू झाला.