रत्नागिरीत अमोल पालये यांच्या ‘गावकी’ कथासंग्रहाचा प्रकाशनाचा सोहळा; २ ऑगस्टला आयोजन

रत्नागिरी:
जनसेवा ग्रंथालय, लक्ष्मीचौक, रत्नागिरी यांच्या तर्फे संगमेश्वरी-तिलोरी बोलीतील प्रसिद्ध लेखक अमोल अनंत पालये यांच्या ‘गावकी’ या कथासंग्रहाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम रविवार, २ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता माधवराव मुळ्ये सभागृह, झाडगांव, रत्नागिरी येथे पार पडणार आहे.
या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक श्री. मदन हजेरी, रत्नागिरी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ. शिल्पाताई सुर्वे, लेखक व बालरोगतज्ज्ञ डॉ. शरद प्रभुदेसाई, तसेच कवी व कोमसाप विश्वस्त श्री. प्रकाश दळवी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमादरम्यान प्रख्यात गझलकार व ललित लेखक श्री. देविदास पाटील हे ‘गावकी’ या कथासंग्रहाचा परिचय करून देणार आहेत. जनसेवा ग्रंथालयाचे अध्यक्ष श्री. प्रकाश दळवी, कार्याध्यक्ष श्री. राहुल कुलकर्णी, कार्यवाह श्री. ओंकार मुळ्ये आणि जनसेवा ग्रंथालय कार्यकारी मंडळाने सर्व साहित्यप्रेमी, रसिक व वाचकांना या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.