री-नीट 2026 विद्यार्थ्यांसाठी कॅप्सन इन्स्टिट्यूटचा पुढाकार

नीट परीक्षा होईपर्यंत सर्व फुल पोर्शन टेस्ट पूर्णपणे मोफत

रत्नागिरी:
री-नीट 2026 परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कॅप्सन इन्स्टिट्यूट, रत्नागिरी शाखेकडून विशेष उपक्रम सुरू करण्यात आला आहे. री-नीट 2026 परीक्षा पुढील महिन्यात होण्याची शक्यता लक्षात घेऊन संस्थेने नीट परीक्षा होईपर्यंत घेण्यात येणाऱ्या सर्व फुल पोर्शन टेस्ट पूर्णपणे मोफत घेण्याचा निर्णय घेतला आहे.

विद्यार्थ्यांना अंतिम परीक्षेपूर्वी अधिकाधिक सराव मिळावा, वेळेचे योग्य नियोजन करता यावे तसेच प्रत्यक्ष परीक्षा पद्धतीचा अनुभव मिळावा या उद्देशाने ही टेस्ट सिरीज आयोजित करण्यात येत आहे. या टेस्टमध्ये परीक्षा पॅटर्ननुसार प्रश्नपत्रिका, सविस्तर निकाल विश्लेषण, विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे परफॉर्मन्स ट्रॅकिंग तसेच तज्ज्ञांचे मार्गदर्शन दिले जाणार आहे.

स्पर्धेच्या वाढत्या वातावरणात विद्यार्थ्यांना योग्य दिशा व आत्मविश्वास मिळावा यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार असल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले. “Restart – The Right Restart, The Brightest Future” या संकल्पनेतून विद्यार्थ्यांना नव्या जोमाने तयारी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

री-नीट 2026 ची गंभीरपणे तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी या मोफत फुल पोर्शन टेस्ट सिरीजचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेकडून करण्यात आले आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी 90291 89999 किंवा 80550 37222 या क्रमांकांवर संपर्क साधावा. तसेच कॅप्सन इन्स्टिट्यूटचे कार्यालय फाटक हायस्कूलजवळ, रत्नागिरी येथे उपलब्ध असल्याची माहिती संस्थेकडून देण्यात आली आहे.