कसाल-मालवण व देवबाग-तारकर्ली-वायरी या प्रमुख रस्ता कामांवरील स्थगिती उठणार
भाजपा नेते निलेश राणे यांचा शासन स्तरावर यशस्वी पाठपुरावा सुरू ; सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना पत्र देत सकारात्मक चर्चा
मालवण | प्रतिनिधी : राज्यात भाजप युती सरकार आल्यापासून कुडाळ व मालवण तालुक्यात भाजप कुडाळ मालवण विधनासभा प्रमुख माजी खासदार निलेश राणे यांच्या पाठपुरव्यातुन उपलब्ध झाला आहे. आता निलेश राणे यांचा कसाल-मालवण व वायरी-तारकर्ली-देवबाग या प्रमुख रस्ता कामांवरील स्थगिती उठण्या बाबत शासन स्तरावर यशस्वी पाठपुरावा सुरू आहे.
मागील आठवड्यात भाजपा नेते निलेश राणे यांनी कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातील बजेटच्या एकूण २ कोटी ७० लक्ष एवढ्या निधीवरील स्थगिती उठवण्याबाबत पाठपुरावा यशस्वी ठरला. आता कुडाळ व मालवण तालुक्यांना जोडणाऱ्या व दोन्ही तालुक्यांसाठी महत्वपूर्ण असलेल्या कसाल-मालवण रस्त्याच्या १ कोटी ८० लाख तर पर्यटन दृष्ट्या महत्वपूर्ण असलेल्या वायरी तारकर्ली देवबाग या रस्त्याच्या १ कोटी ९९ लक्ष एवढ्या निधीवरील स्थगिती उठवण्याची मागणी निलेश राणे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याजवळ केली आहे. सकारात्मक चर्चा झाली आहे.
या विकासकामांवरील स्थगिती उठल्यास कुडाळ मालवण मतदारसंघात पुन्हा नव्याने ३ कोटी ८० लक्ष एवढा विकासनिधी उपलब्ध होणार आहे.












