मनसेचे खळखट्ट्याक ! तोडफोडीमध्ये मोठे नुकसान; तीन घटनांमध्ये १६ मनसैनिकांना अटक

जिल्ह्यातील ९७ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई 

रत्नागिरी | प्रतिनिधी : मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांनी खळखट्ट्याक करण्यास सुरुवात केली असून खेडपासून राजापूरपयर्र्त विविध ठिकाणी आंदोलने आणि तोडफोड करण्यात आलि आहे. या प्रकरणी तब्बल 16जणांना विविध गुन्ह्यात अटक केली असून 97जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

mns

गेली 17 वर्ष रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गाचा मुद्दा मनसेने हाती घेतला आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोकणात बस्तान बसवण्याचा प्रयत्नात असलेल्या मनसेला महामार्ग दुरवस्थेचा मोठा मुद्दा हाती लागला आहे. दोन दिवसापूर्वी पनवेल येथे झालेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेनंतर मनसे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. रायगड येथे झालेल्या तोडफोडीनंतर दक्षिण रत्नागिरीतील पदाधिकारीही आक्रमक झाले आहेत. गुरुवारी रात्री राजापूर हातिवले येथे मनसेच्या पदाधिकार्‍यांनी टोलनाक्याची तोडफोड करीत घोषणाबाजी केली. त्यानंतर रत्नागिरी तालुक्यातील खानू येथे ह्यान इन्फ्रा सोल्यूशन प्रा.लि. या कंपनीचे कंटेनर येथील कार्यालयाची तोडफोड केली. यावेळी पाचजणांनी घोषणाबाजी करीत पळ काढला. याचा व्हिडीओही मनसे पदाधिकार्‍यांनी त्यानंतर व्हायरल केला होता. हा प्रकार घडलेला असतानाच शुक्रवारी दुपारी 11 वा. पालीजवळील उभी धोंड येथे एका जेसीबीची मनसेच्या पदाधिकार्‍यांनी तोडफोड केली.

ठाकरे यांच्या भाषणानंतर अशा घटना घडतील या शक्यतेने पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आली होती. मनसेच्या अनेक पदाधिकार्‍यांशी पोलीस संपर्कात होते. काहींना प्रतिबंधात्मक कारवाईसाठीही पावले उचलली होतीच. दरम्यान राजापूर आणि रत्नागिरी तालूक्यातीलं तोडफोडीच्या तीन घटनांची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी विनीत चौधरी, परिविक्षाधीन पोलीस अधिकारी डॉ. समाधान पाटील, ग्रामीण पोलीस ठाण्याचे मारुती जगताप यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यानंतर पोलिसांनी ह्यान कंपनीच्या आरएमसी प्लॅन्टवर पोलीस बंदोबस्त ठेवला होता. खानूमध्ये झालेल्या तोडफोडीमध्ये सुमारे 1 लाखाचे नुकसान झाले आहे. तर जेसीबीचेही नुकसान झाले आहे. पोलिसांनी यानंतर मनसे पदाधिकार्‍यांची धरपकड करण्यास सुरुवात केली आहे.


राजापूर व रत्नागिरीतील तोडफोडीच्या तीन घटनांमध्ये तीन गुन्हे दाखल झाले असून पोलिसांनी 16जणांना अटक केली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 97जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करीत त्यांना समज देण्यात आली आहे.
यामध्ये हातिवले येथील घटनेत 2 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत व त्यांना 1 दिवस पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आली आहे.
खानू येथील घटनेत एकूण 6 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे व अटकेची कारवाई चालू आहे.
पाली येथील JCB वर काठीने हल्ला करून काचांची तोडफोड प्रकरणी 8 आरोपी ताब्यात घेण्यात आले आहेत व अटकेची कारवाई चालू आहे.
अटक करण्यात येणाऱ्या मनसे च्या 14 जणांना न्यायालयात दिनांक 19/08/2023 रोजी हजर करण्यात येणार आहे.
अटक करण्यात आलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 02 पदाधिकारी व 12 कार्यकर्ते यांचा समावेश असून त्यामध्ये 1) अद्वैत सतीश कुलकर्णी, मनसे शहर अध्यक्ष, रा. अभ्युदय नगर,
2) अविनाश धोंडू सौंदळकर, दक्षिण जिल्हा अध्यक्ष रा. नाचणे रोड रत्नागिरी,
3) रुपेश श्रीकांत चव्हाण रा. कोकण नगर, रत्नागिरी,
4) राजू शंकर पाचकुडे रा. नरबे करबुडे,
5) विशाल चव्हाण रा. भोके,
6) अजिंक्य महादेव केसरकर रा. धवल कॉम्प्लेक्स, रत्नागिरी,
7) कौस्तुभ विश्वनाथ केळकर रा. कोंडगाव साखरपा, देवरुख,
8) सतीश चंद्रकांत खामकर रा. गणेश नगर, कुवारबाव,
9) सुशांत काशिनाथ घडशी रा. कारवांचीवाडी,
10) मनीष विलास पाथरे रा. काळाचौकी मुंबई व
11) सुनील राजाराम साळवी, रा. नाचणे रोड रत्नागिरी.
12) महेश दत्ताराम घाणेकर रा. देऊड,
13) महेश गणपत घाणेकर रा. जाकादेवी
14) रुपेश मोहन जाधव, रा. कोसुंभ, संगमेश्वर सध्या मारुती मंदिर रत्नागिरी. यांचा समवेश आहे.

तसेच रत्नागिरी जिल्ह्यामधून ताब्यात घेण्यात आलेल्या मनसे च्या कार्यकर्त्यांमध्ये

दापोली 03
खेड 20
गुहागर 05
चिपळूण 22
राजापूर 14
मंडणगड 02
लांजा 02
देवरुख 04
रत्नागिरी ग्रामीण 00
रत्नागिरी शहर 05
संगमेश्वर 04
आलोरे 01
सावर्डे 05
बानकोट 00
जयगड 03
नाटे 02
पूर्णगड 05
दाभोळ 00
एकूण 97 इतक्या मन सैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.